कै. चिंतामण वनगा साहेब

सर्व कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ, पालघर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे खरे मार्गदर्शक — वनगा साहेब. भाजपाचा एक सच्चा, निष्ठावंत आणि जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख संपूर्ण जिल्ह्यात घराघरांत पोहोचलेली होती. पालघर जिल्ह्याचे प्रथम खासदार म्हणून त्यांनी केवळ लोकप्रतिनिधीची भूमिका निभावली नाही, तर आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांची जडणघडण आणि मूल्यसंस्कार घडवणारे ते महान नेतृत्व होते. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेली शिकवण, कार्यसंस्कृती, शिस्त आणि संघटनाची निष्ठा हीच भारतीय जनता पार्टी, पालघरची खरी ताकद बनून उभी आहे. वनगा साहेबांनी रुजवलेली मूल्ये आणि आदर्श आजही आमच्या प्रत्येक पावलाला दिशा देत आहेत आणि त्यांच्याच प्रेरणेवर भाजपा पालघर अखंडपणे प्रगतीपथावर वाटचाल करत आहे.