कै श्री विष्णु सावरा साहेब
सलग सहा वेळा आमदार म्हणून जनतेच्या अपार विश्वासाने निवडून येणारे, सगळ्यांचे लाडके दादा, पालघरच्या मातीतून उगवलेले खरे जननेते. भारतीय जनता पार्टीची मुळे पालघर जिल्ह्यात घट्ट रोवण्यामध्ये सावरा साहेबांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक ठरली. ज्या काळात “हम दो, हमारे दो” असे म्हणून भाजपाच्या कार्यकर्त्यांची चेष्टा केली जायची, त्या कठीण दिवसांतही त्यांनी अढळ निष्ठा, अथक परिश्रम आणि अपार जिद्द यांच्या जोरावर पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन प्रत्येक गाव–पाड्यात पोहोचवला. ते फक्त नेते नव्हते… ते कार्यकर्त्यांचे आधार, प्रेरणा आणि मायेने कवटाळणारे आपलेसे दादा होते. त्यांच्या साध्या स्वभावात, प्रेमळ बोलण्यात आणि कार्यकर्त्यांसाठीच्या हृदयातील मायेने आजही प्रत्येक कार्यकर्त्याला घरच्यासारखा आधार मिळतो. सावरा साहेब आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या पावलांनी उमटवलेल्या वाटा, त्यांनी रुजवलेली संघटनशैली आणि पक्षाप्रतीची निष्ठा हीच आजही पालघर भाजपाची खरी ओळख आणि शक्ती बनली आहे.