जिल्हाध्यक्ष – भारतीय जनता पार्टी, पालघर

श्री भारत राजपूत

आमचे सर्वांचे लाडके भरतभाई, ज्यांच्या डॅशिंग, निर्भीड आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे भारतीय जनता पार्टीला पालघर जिल्ह्यात नवे बळ, नवी ऊर्जा आणि नवे आत्मविश्वासाचे केंद्र प्राप्त झाले आहे. विरोधक कोणताही असो— भरतभाईंच्या धडाडीसमोर उभे राहणे कठीणच! त्यांच्या दमदार उपस्थितीने आणि तुफानी नेतृत्वाने तरुणांच्या मनात ते खऱ्या अर्थाने ‘हिरो’ म्हणून स्थान मिळवतात. कार्यकुशल, शिस्तबद्ध आणि विकासाभिमुख नेतृत्वातून त्यांनी पक्षात नवचैतन्य फुलवले असून कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह, आत्मविश्वास आणि जिद्दीची ज्योत प्रज्वलित केली आहे. त्यांच्या मजबूत राजकीय दृष्टी आणि संघटनकौशल्याच्या जोरावरच 2025 च्या निवडणुकीत एक खासदार आणि एक आमदार पालघर जिल्ह्यातून निवडून येण्याचा ऐतिहासिक परिणाम साध्य झाला. आज भाजपा पालघर जिल्हा नव्या क्षितिजांकडे वाटचाल करू शकत आहे, तो फक्त आणि फक्त श्री भारत राजपूत साहेबांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळेच.