मंडळ अध्यक्ष बोईसर
महेंद्र भोने
शांत, संयमी आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या स्वभावामुळे महेंद्र भोणे साहेबांना 2023–2025 आणि 2025–2028 असे सलग दोन कार्यकाळांसाठी मंडळाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली — त्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा असलेला विश्वास याचेच द्योतक. 2020–2025 या काळात पालघर जिल्हा परिषद सदस्य म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिले, आणि त्या काळात त्यांनी जनसेवेची अनेक परिणामकारक कामे करून जनतेच्या मनात भक्कम स्थान निर्माण केले.